मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Dhyneshvree news, Vaibhavi news

दूधगंगा संघाला शासनाने दिलेली अवसायनाची नोटीस उच्च न्यायालयाकडून रद्द,दुग्धराज्य मंत्र्यावर  न्यायालयाचे ताशेरे ,राजकीय हेतूने नोटिस दिल्याचे न्यायालयाचे मत - हर्षवर्धन पाटील         इंदापूर: येथील दुधगंगा दुध उत्पादक सहकारी संघाला शासनाने अवसायनात ( दिवाळखोरीत) काढण्याची दिलेली नोटीस बेकायदेशीर व राजकीय हेतूने दिल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (दि.3) स्पष्टपणे नमूद करून सदरची नोटीस रद्द केली. यावेळी निकाल पत्रात मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित दुग्धविकास खात्याच्या मंत्र्याने नोटीस काढण्यासाठी राजकीय दबाव आणल्याचा स्पष्टपणे उल्लेख करीत ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, दूधगंगा संघाचे संकलन दररोज वाढत असून मंगळवार (दि.5) चे संकलन 42 हजार लिटर होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची माहिती संघाचे संस्थापक व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी इंदापूर येथे दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाच्या कार्यालयात दिली. यावेळी त्यांनी न्यायालयाच्या निकालाची प्रत पत्रकारांना दिली.        राज्य सरकारने तालुका पा...